जरा सुधरा यार...; मोहम्मद शामीने पाकिस्तानच्या ट्रोलर्सची काढली इज्जत
मोहम्मद शामीला त्याचं म्हणणं आणखी सविस्तरपणे समजावून सांगण्यास सांगितलं. त्यावेळी तो म्हणाला की, विश्वचषक सुरू असल्यानं अनेक दिवसांपासून ऐकू येत होतं. मी खेळत नव्हतो, जेव्हा खेळलो तेव्हा 5 विकेट घेतल्या. 4 विकेट्स घेतल्या आणि पुढच्या सामन्यात पुन्हा 5 विकेट घेतल्या. काही पाकिस्तानी खेळाडूंना ते पचत नसेल तर मी काय करावं? त्यांच्या मनात आपणच श्रेष्ठ आहोत, हेच बसलंय. पण मित्रांनो, बेस्ट तो असतो, जो ज्यावेळी खरी गरज असते, त्यावेळी चांगली खेळी करतो. जो मेहनत करतो, जो परफॉर्म करतो, जो संघासाठी उभा राहतो त्याच्यावर माझा विश्वास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहम्मद शामीनं सांगितलं की, वसीम अक्रमनंही याबाबत खुलासा केला आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज शामी पुढे बोलताना म्हणाला की, आता तुम्ही त्यात वाद निर्माण करत आहात. सातत्यानं तेच तेच बोलता आहात. तुम्हाला दुसऱ्या रंगाचा बॉल मिळतोय.
तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून बॉल मिळतायत. आयसीसीनं तुमच्यासाठी वेगळे नियम लागू केलेत.
अरे मित्रांनो, सुधारा स्वतःला आणि वसीम अक्रमनंही हीच गोष्ट त्यांच्या एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितली आहे की, चेंडू बॉक्समध्ये कसा येतो, तो कसा निवडला जातो. कोणता संघ त्यासाठी सर्वात आधी जातो? त्यानंतरही जर हे असंच बोलणार असतील तर काय बोलणार?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा यानं वर्ल्डकपमध्ये वापरण्यात आलेल्या चेंडूबाबत वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना शामी म्हणाला की, तुम्ही खेळाडू नसतानाही त्या पातळीवर खेळला नाहीत, तरीही मुद्दा कळला. तू एक माजी खेळाडू आहेस, जर तू या सर्व गोष्टींबद्दल बोललास तर मला वाटत नाही की, लोक हसण्याशिवाय दुसरं काही करतील. मी बोलण्यात जरा कडवट आहे, हे मान्य. पण मला अशा गोष्टींवर बोलावंच लागेल.