Shubman Gill News : शुभमन गिलची इतिहासाला गवसणी! इंग्रजांच्या डोळ्यासमोरच केला अशक्य वाटणारा पराक्रम, नेमकं काय घडलं?

शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

shubman gill century Eng vs Ind 4th Test

1/11
शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.
2/11
तो पहिलाच असा कर्णधार ठरला आहे, ज्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत तब्बल चार शतके ठोकली आहेत.
3/11
आतापर्यंत डेब्यू टेस्ट सिरीजमध्ये तीन-तीन शतकांची कामगिरी फक्त काही महान खेळाडूंनी केली होती. सर डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव स्मिथ. पण गिलने त्यांनाही मागे टाकत इतिहास रचला आहे.
4/11
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीतही शतक झळकावले आहे.
5/11
यासोबत शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाचे महान सर डॉन ब्रॅडमन तसेच भारताचे सुनील गावसकर यांच्याशी बरोबरी केली आहे.
6/11
आतापर्यंत कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम या दोघांच्याही नावावर होता.
7/11
पण, दोघांनीही घरच्या मैदानावर हा पराक्रम केला तर शुभमन गिलने परदेशात पदार्पणाच्या कसोटी हा पराक्रम केला.
8/11
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गिलने शतक झळकावले. मात्र, शतक झळकावल्यानंतर तो 103 धावा काढून बाद झाला.
9/11
लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावले.
10/11
त्यानंतर गिलने बर्मिंगहॅम कसोटीत अनेक विक्रम मोडले. पहिल्या डावात त्याने 269 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटवरून 161 धावा आल्या.
11/11
लॉर्ड्स कसोटीत गिलची बॅट शांत राहिली. आता त्याने मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर शतक झळकावले आहे.
Sponsored Links by Taboola