Rishabh Pant : रिषभ पंत मँचेस्टर कसोटीत खेळल्यास विकेटकीपिंग करणार की नाही? शुभमन गिलनं दिली सर्वात मोठी अपडेट

रिषभ पंत मँचेस्टर कसोटीत खेळल्यास विकेटकीपिंग करणार की नाही? शुभमन गिलनं दिली सर्वात मोठी अपडेट

रिषभ पंत

1/5
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथी कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. या कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील संघाचा प्रयत्न असेल.
2/5
भारताचा कॅप्टन शुभमन गिल यानं मँचेस्टर कसोटीपूर्वी मोठी अपडेट दिली आहे. भारताचा उपकॅप्टन आणि विकेटकीपर रिषभ पंतबाबत ती अपडेट आहे.
3/5
रिषभ पंत लॉर्डस कसोटीत दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो चौथ्या कसोटीत खेळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रिषभ पंत चौथ्या कसोटीत फलंदाज म्हणून खेळेल अशाही चर्चा रंगल्या होत्या. अखेर भारताचा कॅप्टन शुभमन गिलनं सर्वांचा संभ्रम दूर केला आहे.
4/5
उपकॅप्टन रिषभ पंत यानं या मालिकेत चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या कसोटीत रिषभ पंतनं दोन शतकं केली होती. मालिकेत पिछाडीवर असलेल्या संघाला मँचेस्टर कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करावी लागेल. रिषभ पंत मैदानावर असल्यास तो संघातील खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं रिषभ पंत फिट असणं भारतासाठी महत्त्वाचं होतं.
5/5
भारताचा कॅप्टन शुभमन गिल यानं रिषभ पंत मँचेस्टर कसोटीत विकेटकीपिंग करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं दुखापतींचा सामना करणाऱ्या टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे.
Sponsored Links by Taboola