सारा तेंडुलकर वयाने मोठी, तरीही अर्जुनचं लग्न आधी जुळलं, कोणत्या कारणाने होतोय उशीर? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर वयाने मोठी, तरीही अर्जुनचं लग्न आधी जुळलं, कोणत्या कारणाने होतोय उशीर? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Sara Tendulkar

1/10
भारताचे महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सानिया चंडोक हिच्यासोबत पार पडला. हा साखरपुडा दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थित पार पडला.
2/10
दरम्यान, लोकांच्या मनात आता हा प्रश्न उपस्थित झाला आहे की, सचिनने मोठ्या मुलीच्या आधी मुलाचा साखरपुडा का उरकला? काही लोक तर यावर वेगवेगळे तर्क वितर्क लावताना पाहायला मिळत आहेत.
3/10
सचिन तेंडुलकर यांना दोन अपत्य आहेत. पहिली मुलगी सारा तेंडुलकर आणि दुसरा मुलगा अर्जुन तेंडुलकर. सारा तेंडुलकरचे वय 27 वर्षे असून अर्जुन तेंडुलकर 25 वर्षांचा आहे. म्हणजेच अर्जुन साऱ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. भारतीय कुटुंबांमध्ये प्रामुख्याने मुलींच्या लग्नाला प्राधान्य दिले जाते.
4/10
मात्र सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबात साऱ्याआधी अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. वयाच्या 25 व्या वर्षीच त्याने साखरपुडा केला आहे. सध्या तो आपल्या क्रिकेट करिअरसाठी कठोर मेहनत घेत आहे.
5/10
वडील सचिन तेंडुलकरप्रमाणे अजूनपर्यंत त्याला क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवलेले नाही. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतो आणि रणजी क्रिकेटमध्ये गोव्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो.
6/10
अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत चाहत्यांमध्ये वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. काही लोक म्हणत आहेत की अजून लग्नाची गरज नाही, करिअरवर लक्ष द्यायला हवे. तर काही लोक साऱ्याआधी अर्जुनच्या लग्नामागे वेगवेगळे तर्क मांडत आहेत.
7/10
नेटकऱ्यांच्या मते, सारा तेंडुलकर आणि भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल यांच्यातील नात्याच्या अफवेचं हे कारण असू शकतं. तर काहींचं म्हणणं आहे की सारा तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये मेडिसिनचं शिक्षण घेत आहे, त्यामुळे तिच्या लग्नाला विलंब होतोय.
8/10
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील नात्याच्या चर्चा सोशल मीडियावरून सुरू झाल्या होत्या. दोघांनी पोस्ट केलेल्या काही फोटोंचे लोकेशन सारखेच असल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या.
9/10
अलीकडेच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या युवीकॅन फाउंडेशनच्या कार्यक्रमातही त्यांच्या नात्याबद्दल बोललं गेलं होतं. याच मुद्द्यावरून साऱ्याच्या संदर्भात गिलची चेष्टा रवींद्र जडेजाने केली होती.
10/10
दरम्यान, आता अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा पार पडल्यानंतर साराच्या लग्नाची चर्चा देखील सुरु झाली आहे. सचिन तेंडुलकरचा जावई कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत.
Sponsored Links by Taboola