Sachin Tendulkar : लॉर्ड्समध्ये क्रिकेटच्या देवाचं पोट्रेट अनावरण, सचिनला आठवले 1989 चे दिवस; म्हणाला, माझ्यासाठी...

भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंडमधील मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

Continues below advertisement

Sachin Tendulkar

Continues below advertisement
1/9
भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंडमधील मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.
2/9
लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
3/9
त्याआधी भारतीय क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकरच्या पोट्रेटचे अनावरण लॉर्ड्सवरील एमसीसी संग्रहालयात करण्यात आले.
4/9
हे पोट्रेट नामवंत कलाकार स्टुअर्ट पिअर्सन राईट यांनी काढले आहे.
5/9
ते यावर्षीच्या अखेरीपर्यंत संग्रहालयात राहणार आहे. त्यानंतर ते पॅव्हेलियनमध्ये हलवले जाणार आहे.
Continues below advertisement
6/9
एमसीसी संग्रहात असलेले हे पाचवे भारतीय खेळाडूंचे पोट्रेट आहे.
7/9
त्यातील चार (कपिल देव, बिशन सिंग बेदी, दिलीप वेंगसरकर आणि तेंडुलकर) ही पोट्रेट राईट यांनीच काढली आहेत.
8/9
लॉर्ड्समध्ये पोट्रेटचे अनावरण झाल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला की, मी पहिल्यांदा लहान वयात 1988 साली लॉर्ड्सला आलो होतो. 1989 मध्ये स्टार क्रिकेट क्लबच्या टीमसोबत पुन्हा तिथे जाण्याची संधी मिळाली. आणि तेव्हा पॅव्हिलियनजवळ उभा राहून या ऐतिहासिक जागेचं दर्शन घेत होतो आणि मनात शांतपणे मोठी स्वप्नं पाहत होतो.
9/9
पुढे तो म्हणाला, आज, त्याच ठिकाणी माझं चित्र अनावरण होत आहे, हे क्षण शब्दांत मांडणं खूप कठीण आहे. असं वाटतंय, आयुष्य एक सुंदर फेरी पूर्ण करून परत इथेच आलंय. मन भरून आलंय… आणि मनापासून आभार मानतो.
Sponsored Links by Taboola