SA vs AUS WTC Final 2025: द.अफ्रिकनं ऑस्ट्रेलियाला रडवलं; WTC ची ट्रॉफी जिंकणार?, 27 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी
SA vs AUS WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे, आता त्यांना ट्रॉफी उंचावण्यासाठी फक्त 69 धावा करायच्या आहेत.
Continues below advertisement
SA vs AUS WTC Final 2025
Continues below advertisement
1/9
SA vs AUS WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट गमावून 213 धावा केल्या आहेत. (Image Credit-ICC)
2/9
आफ्रिकन संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आला आहे, आता त्यांना ट्रॉफी उंचावण्यासाठी फक्त 69 धावा करायच्या आहेत. (Image Credit-ICC)
3/9
तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत एडेन मार्करामने 102 धावा केल्या आहेत, तर टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असूनही 65 धावांवर नाबाद आहे. (Image Credit-ICC)
4/9
पहिल्या दोन दिवसांत गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले असले तरी, तिसऱ्या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले.(Image Credit-ICC)
5/9
वियान मुल्डर आऊट झाल्यानंतर एडेन मार्कराम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी जबाबदारी घेतली. सुरुवातीला त्यांनी सावकाश फलंदाजी केली आणि नंतर धावफलक वेगाने पुढे सरकवला. (Image Credit-ICC)
Continues below advertisement
6/9
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, तिसऱ्या विकेटसाठी त्यांची भागीदारी 143 धावांवर पोहोचली आहे. मार्करामने 102 धावा केल्या आहेत, तर बावुमा 65 धावा करून नाबाद आहे.(Image Credit-ICC)
7/9
आयसीसी स्पर्धांमध्ये महत्त्वाच्या क्षणी पराभव झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बऱ्याच काळापासून 'चोकर्स' असे म्हटले जात आहे. मात्र आता दक्षिण अफ्रिकेला 27 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
8/9
गेल्या वर्षी 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाकडून पराभव पत्करल्यानंतर हा टॅग अधिकच गडद झाला होता, परंतु आता जर दक्षिण अफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्यास केवळ ट्रॉफीच नाही तर आफ्रिकन संघ चोकर्सचा टॅग काढून एक नवा इतिहास रचेल.(Image Credit-ICC)
9/9
चौथ्या दिवसाचा खेळ आता निर्णायक असेल आणि संपूर्ण जगाचे लक्ष दक्षिण आफ्रिकेचा संघ इतिहास रचू शकेल का आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावेल का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. (Image Credit-ICC)
Published at : 14 Jun 2025 09:23 AM (IST)