रोहित शर्माच्या करिअरमधील महत्त्वाचा क्षण, दुबईतील मॅचपूर्वी मुंबईत घडलं आक्रित, लहानपणी ज्या जागेवर खेळला तिकडे....एबीपी माझाच्या बातमीनंतर म्हाडा मार्ग काढणार

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सामना 9 मार्चला होणार आहे. त्यापूर्वीच रोहित शर्मानं जिथं क्रिकेटचे धडे घेतले तिथली खेळपट्टी आणि नेटस म्हाडानं हटवले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रोहित शर्मानं मुंबईतील गौराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तिथल्या मैदानाची मालकी म्हाडाकडे होती. त्या मैदानावर क्रिकेटसह फुटबॉल देखील खेळलं जातं.

म्हाडानं मैदानावरील क्रिकेट टर्फ आणि फुटबॉल नेट हटवलं होतं. म्हाडानं यासंदर्भात दावा केला होता की याचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्यानं तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी, गुरुवारी करण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अमृता वर्मा यांनी इथं मोफत प्रशिक्षण दिलं जात असल्याचं म्हटलं. रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी 29 वर्ष अनेक खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिलं आहे. म्हाडाकडे तोडक कारवाई रोखण्यासाठी वेळ मागितला मात्र त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, असं वर्मा म्हणाल्या.
दिनेश लाड यांनी म्हटलं की या मैदानातून 100 क्रिकेटर घडले आहेत. आता नेट हटवल्यानं फुटबॉल आणि क्रिकेट विभागातील वेगळेपण मिटेल. मुलं खेळू शकणार नाहीत. शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, हरमीत सिंग हे देखील याच क्रिकेटच्या मैदानात धडे घेऊन घडले आहेत.
एबीपी माझानं यासंदर्भातील बातमी दाखवल्यानंतर तोडक कारवाई प्रकरणी बैठक होणार आहे. आज दुपारी हा विषय सोडवला जाईल, असं म्हाडानं म्हटलं. म्हाडा, शाळेचे ट्रस्टी, व्यवस्थापन यांच्यात बैठक होऊन मार्ग निघेल, असं सांगण्यात आलं आहे.