Rohit Sharma : शुभमन गिलच्या शतकी खेळीवर रोहित शर्मा खूश, एक गोष्ट चांगली वाटली, हिटमॅन म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्मानं बांगलादेश विरुद्ध नाबाद 101 धावांची खेळी करणाऱ्या शुभमन गिलच्या खेळीचं कौतुक केलं आहे. भारतानं पहिला सामना 6 विकेटनं जिंकला.
रोहित शर्मा, शुभमन गिल
1/5
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर संघाच्या कामगिरीवर भाष्य केलं. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या विजयासह सुरुवात केली आहे.
2/5
बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतानं 4 विकेट गमावत विजय मिळवला. यामध्ये शुभमन गिलची खेळी महत्त्वाची ठरली.
3/5
शुभमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा 41 धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं केएल राहुल याच्यासोबत 87 धावांची भागिदारी करत विजय मिळवून दिला.
4/5
शुभमन गिलच्या कामगिरीचं कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला, शुभमन गिल आणि केएल राहुल शेवटपर्यंत संयमी दिसून आले.
5/5
रोहित शर्मा पुढं म्हणाला की शुभमन गिलनं आज जी कामगिरी करुन दाखवली त्यामुळं आम्हाला यामुळं आश्चर्य वाटलेलं नाही. आम्हाला शुभमन गिलचा क्लास माहिती आहे. शुभमन गिल शेवटपर्यंत शेवटपर्यंत मैदानावर होता हे पाहणं चांगलं होतं, असं रोहित शर्मानं म्हटलं. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला दुबईत सामना होणार आहे.
Published at : 21 Feb 2025 09:17 AM (IST)