TATA IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आरोन फिंच रचणार विक्रम!

Aaron Finch (Photo Credit: Twitter)

1/5
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने- सामने येणार आहेत.
2/5
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज आरोन फिंच नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आयपीएलमध्ये आरोन फिंचनं आतापर्यंत 8 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या हंगामात तो कोलकाताच्या संघाकडून खेळणार आहे. म्हणजे, तो आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू ठरेल. आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व करणारा आरोन फिंच पहिला खेळाडू असेल.
3/5
आयपीएलचा पंधरावा हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई- कोलकाता यांच्यात रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोलकात्याच्या संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर, चेन्नईच्या संघाची जबाबदारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी संभाळत आहे.
4/5
आयपीएलमध्ये आरोन फिंचनं आतापर्यंत 8 संघाचं प्रतिनिधित्व केलंय. राजस्थान रॉयल्स (2010), दिल्ली (2011-12), पुणे वॉरिअर्स (2013), सनरायझर्स हैदराबाद (2014), मुंबई इंडियन्स (2015), गुजरात लाईन्स (2016-17), किंग्ज इलेव्हन पंजाब (2018), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (2020), कोलकाता नाईट रायडर्स (2022). आयपीएलच्या पंधराव्या हंगामात फिंच कोलकात्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे.
5/5
फिंचने आयपीएलमध्ये आतापर्यंत 87 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्यानं 25.70 च्या सरासरीनं 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
Sponsored Links by Taboola