Ranji Trophy 2022 Semifinal: यशस्वी जैस्वालची चमकदार कामगिरी, सलग तीन डावात ठोकलं शतक
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे.मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात बंगळुरू मैदानात रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यातील दोन्ही डावात यशस्वी जैस्वालनं शतक ठोकून भारतीय संघाचं दार ठोठावलंय.या कामगिरीसह त्यानं रणजी ट्रॉफीच्या सलग तीन डावात तीन शतक ठोकली आहेत.यापूर्वी उत्तराखंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या क्वाटर फायनल सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानं शतक केलं होतं.
जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईचं पारडे जड झालंय.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सचा भाग होता.आयपीएल 2022 मध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं राजस्थानसाठी 10 सामन्यात 258 धावा केल्या. आयपीएल 2022 मधील काही सामन्यात यशस्वी जैस्वालला प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं होतं. परंतु, अखेरच्या काही सामन्यात त्यानं चांगली खेळी केली.
मुंबईसाठी दुसऱ्या डावात अरमान जाफरनंही शानदार शतक झळकावलं आहे. जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईचं पारडे जड झालंय. या सामन्यात मुबंईच्या संघानं 500 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली. या सामन्यात जाफरनं 127 धावांची शानदार खेळी केली.
या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईच्या संघानं 393 धावा केल्या. मुंबईच्या पहिल्या डावात हार्दिक तमोरे आणि यशस्वी जैस्वालनं शतक ठोकलं. उत्तर प्रदेशकडून करन शर्मान सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रेदशचा संघ पहिल्या डावात 180 धावा करू शकला. उत्तर प्रदेशकडून शिवम मावीनं 48 आणि माधव कौशिकनं 38 धावा केल्या. मुंबईकडून तनुश कोटीयान, मोहीत अवस्थी आणि तुषार देशपांडेनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.