विजयाचा षटकार, गुणतालिकेत अव्वल
गतविजेत्या इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. सहा सामन्यात इंग्लंडला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडचा संघ पाच पराभवासह तळाला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद करत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघाने सहाव्या विजयासह सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघाचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्याबरोबर टीम इंडियाला खेळायचे आहे.
विश्वचषकात टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद केली. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारताने 229 धावांच्या माफक आव्हानाचा यशस्वी बचाव केला.
भारताच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत गारद झाला
रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला. शामीने चार तर बुमराहने तीन विकेट घेतल्या.
भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर बुमराहने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव याला दोन विकेट मिळाल्या तर जाडेजाना एका फलंदाजाला तंबूत पाठवले.
जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत 14 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट बुमराहच्या नावावर आहेत.