न्यूझीलंडचं फायनलचं स्वप्न भंगलं, भारताने 70 धावांनी हरवले
भारताकडून उपांत्य सामन्यात न्यूजीलंडचा 70 धावांनी पराभव झाला. या पराभवासह न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले.
NZ
1/5
वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंडचे फायनलमध्ये पोहचण्याचे आव्हान संपुष्टात आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 397 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंडला 327 धावांपर्यंत मजल मारती आली.
2/5
भारताने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांपर्यंत मजल मारु शकला. शामीने न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना बाद केले. डॅरेल मिचेल याने 134 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. कर्णधार केन विल्यमसन यानेही अर्धशतक झळकावले.
3/5
यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडला साखळी सामन्यात पाच विजय आणि चार पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.
4/5
न्यूझीलंडकडून यंदाच्या विश्वचषकात रचिन रविंद्र याने सर्वाधिक 578 धावा केल्या. डॅरेल मिचेल दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 552 धावांचा पाऊस पाडलाय.
5/5
गोलंदाजीत मिचेल सँटनर याने सर्वाधिक 16 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट याने 14 विकेट घेतल्या आहेत.
Published at : 15 Nov 2023 11:39 PM (IST)