Cricket World Cup : क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर?, सचिनसोबत 'या' दिग्गजांचा समावेश
विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावावर असंख्य विक्रम आहेत. यातील एक म्हणजे क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावाही सचिनच्या नावावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यानंतर सचिन सर्वात आधी 1992 च्या विश्वचषकात खेळला.
त्यानंतर 2011 पर्यंत विश्वचषक खेळलेल्या सचिनने 2 हजार 278 धावा विश्वचषकात केल्या आहेत.
सचिननंतर नंबर लागतो, माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉटिंगचा. रिकीने 1 हजार 743 धावा क्रिकेट विश्वचषकात केल्या आहेत.
श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू कुमार संगकाराने 1 हजार 532 धावा क्रिकेट विश्वचषकात केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने 1 हजार 225 धावा केल्या असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलीयर्सने 1 हजार 207 धावा केल्या असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.