Mohammad Shami : तो दिवस कदाचित आमचा शेवटचा ठरला असता, मोहम्मद शमीनं भीषण अपघाताबद्दल 6 वर्षानंतर सगळं सांगितलं
टीम इंडियाचा आक्रमक गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा मित्र उमेश कुमार यांनी शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये शमीच्या जीवनातील दोन कठीण प्रसंग या मुलाखतीत मांडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानसाठी फिक्सिंगचा आरोप झाला त्यावेळी मोहम्मद शमी कोलमडून पडल्याचं उमेश कुमार यांनी सांगितलं. फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर एका दिवशी पहाटे चार वाजता शमी 19 व्या मजल्यावर गॅलरीत उभा होता. त्याच्या जीवनातील संघर्षाचा काळ होता. तो जीवन संपवण्याच्या विचारात होता, असं उमेश कुमार यांनी सांगितलं.
मोहम्मद शमीला फिक्सिंग प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर उत्तराखंडला गेलो होतो. तिथून परत येत असताना 25 मे 2018 रोजी मोहम्मद शमी आणि उमेश कुमार यांच्या कारचा अपघात झाला होता. या कार अपघाताबद्दल मोहम्मद शमीनं भाष्य केलं.
पहाटेच्या वेळी उत्तराखंडवरुन येत होता. विटांनी भरलेल्या ट्रकनं पुढच्या बाजूनं धडक दिली होती. कारच्या पुढील भागापासून मागील भागापर्यंत ट्रक घासत गेला. शमी जखमी झाला होता चेहऱ्यावर रक्त वाहत होतं, अशी आठवण उमेश कुमार आणि मोहम्मद शमी यांनी सांगितली.
सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ज्यानं अपघात केला तो पळून गेला होता. शमीला आम्ही रुग्णालयात दाखल केलं, सर्जरी झाली, त्या दिवशी सर्वकाही संपलं असं वाटलं होतं, असं उमेश कुमार आणि मोहम्मद शमी म्हणाले.
आपल्या आयुष्याबद्दल तक्रारी संपणार नाहीत. तुमची चांगली कामं किंवा तुमच्या आई वडिलांची चांगली कामं असतील. कारण विटांनी भरलेल्या ट्रकच्या धडकेत कारची स्थिती वाईट होती. पण चांगली कामं आपल्याला वाचवतात, असं मोहम्मद शमी म्हणाला.