Player of the match | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर राहिलेले पाच भारतीय खेळाडू

संपादित फोटो

1/5
युवराज सिंह सामनावीर तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतो, जरी तुमचा संघ हरला तरी तुम्ही प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी भारताकडून सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. भारतामध्ये सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा सामनावीरचा किताब पटकावला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तो भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. या 34 प्लेअर ऑफ द मॅचच्या सामन्यात, त्याने वनडेमध्ये 27 वेळा आणि टी -20 मध्ये सात वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.
2/5
रोहित शर्मा भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 35 वेळा सामनावीरचे विजेतेपद पटकावले आहे. रोहितची तुलना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत एकूण 381 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने वनडेमध्ये 21 वेळा, टी -20 मध्ये 10 वेळा आणि कसोटीत 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे.
3/5
सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानावर दादा म्हणून प्रसिद्ध आणि भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने आतापर्यंत 37 वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली एकूण 424 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सलग चार एकदिवसीय सामन्यांमध्ये सामनावीर होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
4/5
विराट कोहली भारताचा सध्याचा कर्णधार आणि जगातील महान फलंदाजांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 57 सामनावीरचे विजेतेपद पटकावले आहे. तो आतापर्यंत एकूण 440 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने एकदिवसीय सामन्यात 36 वेळा, टी -20 मध्ये 12 वेळा आणि कसोटीत 9 वेळा सामनावीराचे विजेतेपद पटकावले आहे.
5/5
सचिन तेंडुलकर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, ज्यांना क्रिकेटचा देव म्हटले जाते, त्यांनी भारतासाठी सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, एकदिवसीय सामन्यात 62 वेळा आणि कसोटीत 14 वेळा सामनावीर झाला आहे.
Sponsored Links by Taboola