In Pics : केएल राहुल पत्नीसह महाकाल देवाच्या दर्शनाला, पारंपरिक वेशभूषेतील फोटो आले समोर

KL Rahul and athiya shetty : मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या केएल राहुलने पहिल्या दोन्ही कसोटीतही खास कामगिरी केलेली नाही.

KL Rahul and Athiya Shetty

1/10
खराब फॉर्ममुळे सातत्याने टीका होत असलेला सलामीवीर केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याची पत्नी अथिया शेट्टीसोबत उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे.
2/10
त्याने त्याठिकाणी पोहोचून बाबा महाकालचे दर्शन घेत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली.
3/10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलने खास कामगिरी केलेली नाही.
4/10
सध्या त्याचा अतिशय खराब फॉर्म पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या प्लेईंग इलेव्हनमधील स्थानावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
5/10
दुसरीकडे, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा राहुल संघाचा एक भाग होता पण त्याच्याकडून उपकर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
6/10
दरम्यान आता या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी केएल सराव करत असून पत्नी अथियासोबत देवदर्शनही करत आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यावर आता राहुल महाकालेश्वर मंदिरातही पोहोचला.
7/10
केएल राहुलने अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केलं. ज्यानंतर आता दोघेही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगात पारंपारिक वेशभूषेत पूजा करताना दिसले, या सर्वाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
8/10
याआधी केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाचे विविध फोटोही व्हायरल झाले होते.
9/10
लग्नाच्या विविध फंक्शनमधील फोटो ज्यात हळदी, संगीत इत्यादीचे फोटोही व्हायरल झाले होते.
10/10
लग्नानंतर दोघांचे विविध ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असून नेटकरीही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
Sponsored Links by Taboola