Jos Buttler : चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप! जोस बटलरचा संघाला रामराम

बुधवारी अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Jos Buttler steps down as England captain

1/7
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर जोस बटलरने इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
2/7
34 वर्षीय बटलरच्या नेतृत्वात शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड संघ अखेरचा सामना खेळणार आहे.
3/7
बुधवारी अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
4/7
बटलर म्हणाला की, मी इंग्लंड संघाचे कर्णधारपद सोडत आहे. माझ्यासाठी आणि संघासाठी हा निर्णय योग्य आहे. कोणीतरी येईल आणि बाझसोबत (मॅककुलम) काम करेल आणि संघाला जिथे असायला हवे तिथे घेऊन जाईल. माझ्या नेतृत्वात ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची होती. पण, निकाल आमच्या मनासारखा लागला नाही. त्यामुळे कर्णधार पदावरून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते.
5/7
बटलरने जून 2022 मध्ये कर्णधारपद सांभाळताना इंग्लंडला 2022 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
6/7
अलीकडच्या स्पर्धामध्ये इंग्लंडला संघर्ष करावा लागला.
7/7
एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्यांना विजेतेपद राखण्यात अपयश आले.
Sponsored Links by Taboola