सचिन बघाय चला, रोहित बघाय चला; मुंबई इंडियन्सच्या सपोर्टसाठी वानखेडेवर 19 हजार शाळकरी मुलं

भिवंडी मनपा शाळेतील 500 विद्यार्थ्यांनी आज वानखेडे स्टेडियममध्ये IPL सामना पाहण्याचा आनंद घेतला.

Continues below advertisement

School student at wankhede to support MI

Continues below advertisement
1/8
भिवंडी मनपा शाळेतील 500 विद्यार्थ्यांनी आज वानखेडे स्टेडियममध्ये IPL सामना पाहण्याचा आनंद घेतला.
2/8
मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी मुंबईतून तब्बल 19,000 विद्यार्थ्यांची आजच्या सामन्याला उपस्थिती होती.
3/8
भिवंडी महानगरपालिकेच्या विविध शाळांतील सुमारे 500 विद्यार्थ्यांनी आज वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल सामना पाहिला.
4/8
रिलायन्स फाउंडेशन आणि ह्युमाना एनजीओच्या पुढाकाराने या विद्यार्थ्यांना प्रथमच स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्याची संधी मिळाली.
5/8
भिवंडी येथून तब्बल 15 बसेसद्वारे या विद्यार्थ्यांना स्टेडियममध्ये नेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसत होता.
Continues below advertisement
6/8
थेट मैदानात जाऊन सामना पाहण्याची संधी मिळाल्याने आजचा दिवस या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
7/8
ज्या सचिन तेंडुलकरला, रोहित शर्मा टीव्हीवर पाहत होतो, त्यांना प्रत्यक्ष पाहून, तसेच खेळाडूंची फटकेबाजीही प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला
8/8
शाळेतील चिमुकल्यांसोबत क्रिकेट पाहण्याचा आनंद रिलायन्स फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी यांनी देखील घेतला.
Sponsored Links by Taboola