Jaydev Unadkat Car : 'या' युवा क्रिकेटपटूने खरेदी केली एक कोटींची कार, आयपीएलमुळे 'मालामाल'; एकूण संपत्ती माहितीय?
आयपीएलमुळे भारतातील अनेक क्रिकेटपटूंना 'अच्छे दिन' आले आहेत. आयपीएलमध्ये अनेक युवा क्रिकेटपटूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. यातीलच एक म्हणजे जयदेव उनाडकट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजयदेव उनाडकट भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग आहे. नुकतेच त्याला प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी मिळाली.
जयदेव उनाडकटला खरी ओळख आयपीएलमधून मिळाली. 2018 च्या हंगामात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
जयदेव उनाडकटने नुकतीच मर्सिडीज बेंझ जीएलई एसयूव्ही ही आलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटींहून अधिक आहे.
ही एसयूव्ही मर्सिडीजच्या आलिशान कारपैकी एक आहे. ही कार केवळ 7.2 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने आणि ताशी 225 किलोमीटर वेगाने धावू शकते.
आयपीएल हे जयदेव उनाडकटच्या कमाईचे प्रमुख साधन आहे. या स्पर्धेतून अनेक क्रिकेटपटूंना 'मालामाल' होण्याची संधी मिळाली आहे.
जयदेव उनाडकटची सध्याची कमाई 40 हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला त्याची कमाई 33 लाखांपेक्षा जास्त आहे.
जयदेव उनाडकटची सध्याची संपत्ती 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.