In Pics: दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज, फलंदाजांचा जोमात सराव सुरु
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळवण्यात येणार असून रोहित शर्मा कर्णधार असून फलंदाजीतही मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. बीसीसीआयने भारतीय फलंदाजाचे सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहितनंतर माजी कर्णधार विराटकडेही अनेकांच्या नजरा असणार आहेत. पण युवा खेळाडूंना संधी देण्याकरता तो विश्रांती करण्याची शक्यताही निर्माण होत आहे.
याशिवाय केएल राहुल आता संघात परतला असून दुसऱ्या सामन्यात तो नक्कीच खेळताना दिसेल.
याशिवाय सूर्यकुमारही अंतिम 11 मध्ये नक्कीच असेल कारण त्याने पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
यष्टीरक्षक ऋषभ पंत तर भारतीय संघातील हुकूमी एक्का असून बीसीसीआयने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंत कोच द्रविडसोबत दिसून येत आहे.
पहिल्या सामन्यात अंतिम 11 मध्ये नसणारा श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरतो हे देखील पाहावे लागेल.
दुसऱ्या सामन्य़ापूर्वी संघात आलेला मयांकला संधी मिळणं थोडं कठीण आहे, पण सरावात तो घाम गाळताना दिसत आहे.
दीपक हु़डाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो नक्कीच संघात असेल.