Under 19 World Cup : भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार, पाहा यादी
Virat Kohli
1/8
भारतानं नुकतंच अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलं. याआधीही भारताने 2000, 2008, 2012, 2018 साली या विश्वचषकावर नाव कोरलं आहे
2/8
यंदा भारताने कर्णधार यश धुलच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक जिंकला.
3/8
सर्वात आधी 2000 साली भारतीय संघात खालच्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक भारताने जिंकला होता. .
4/8
2000 सालानंतर 2008 साली भारताने पुन्हा एकदा अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं. यावेळी कर्णधार होता भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असणारा विराट कोहली.
5/8
या यादीतील असा एकमेव खेळाडू ज्याला भारतीय संघात चमकण्याची संधी मिळाली नाही तो म्हणजे उन्मुक्त चंद. 2012 साली भारताला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त आता भारताकडून क्रिकेट खेळत नाही.
6/8
2012 नंतर थेट 2018 मध्ये भारताने मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर 19 विश्वचषक उचलला.
7/8
यानंतर आता थेट 2022 साली भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला चार विकेट्सने मात देत स्पर्धा जिंकली आहे.
8/8
स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांवेळी यशसह इतर काही खेळाडू कोरोनाबाधित झाले असताना निशांत सिंधू याने कर्णधारपद सांभाळला होतं.
Published at : 08 Feb 2022 09:14 PM (IST)