IND vs ZIM : रियान पराग ध्रुव जुरेल टीम इंडियात इन, शुभमन गिल कुणाला संघातून आऊट करणार, पाचव्या मॅचसाठी नवी रणनीती
भारतानं झिम्बॉब्वेच्या विरूद्धच्या पाच टी 20 मॅचच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आज मॅचमध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाचव्या मॅचमध्ये यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, आवेश खान, खलील अहमद या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
यशस्वी जयस्वालला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेल्यास अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला येऊ शकतो.
रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना पुन्हा एकद संधी मिळू शकते. आजच्या मॅचमध्ये दोघं कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा दोघे डावाची सुरुवात करतील. तर, संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर फलंदाजी येऊ शकतो. शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांच्या मॅच फिनिशरची भूमिका पार पाडावी लागेल.