IND vs SL : 317 धावांच्या फरकाने सामना जिंकत मालिकाही 3-0 ने भारताने जिंकली, कोहली ठरला मालिकावीर
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत 3-0 ने विजयी झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताने तिन्ही सामने एकहाती जिंकत मालिकेत श्रीलंकेला व्हाईट वॉश दिला आहे.
भारताने मालिकेतील पहिला सामना 67 धावांच्या फरकाने जिंकला.
त्यानंतर दुसरा सामना 4 विकेट्च्या फरकाने जिंकला.
ज्यानंतर तिसरा आणि अखेरचा सामना तर तब्बल 317 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत इतिहास रचला.
भारताने मिळवलेला हा विजय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.
सामन्यात विराटने नाबाद 166 तर शुभमननं 116 धावा केल्या. ज्यामुळे विराटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
विराटने तीन सामन्यांच्या मालिकेत 2 शतकं ठोकल्यामुळं त्याला मालिकावीर म्हणूनही गौरवण्यात आलं.
भारतीय संघ आता यानंतर न्यूझीलंडविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.