In Pics : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने भारत विजयी, मालिकाही 2-1 ने भारताने जिंकली

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारताने 7 गडी राखून जिंकला आहे.

IND vs SA

1/10
 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 7 विकेट्सनी विजयी झाला आहे.
2/10
या विजयासह भारतानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 नं जिंकलीय.  
3/10
आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली.
4/10
ज्यानंतर भारताने अफलातून गोलंदाजी करत अवघ्या 99 धावांवर दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केलं.
5/10
यावेळी कुलदीपनं 4, सुंदर, शाहबाज आणि सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
6/10
त्यानंतर 100 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताने शुभमन्या 49 धावांच्या जोरावर सामना 7 विकेट्सनी सामना जिंकला.
7/10
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी ,बी. फॉर्च्युन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
8/10
याआधी मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तर दुसरा भारताने जिंकल्याने मालिका 1-1 अशी होती.
9/10
त्यामुळे आजचा सामना निर्णायक होता. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार होते.
10/10
अखेर भारताने विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली असून मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराजला गौरवण्यात आलं.
Sponsored Links by Taboola