IND vs ENG: यशस्वी जैस्वाल कॅच का सोडतोय?; एकेकाळी बेस्ट फिल्डर राहिलेल्या मोहम्मद कैफने सांगितलं यामागचं कारण!
IND vs ENG: यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. मात्र त्याने सामन्यात अनेक झेल सोडले.
Continues below advertisement
IND vs ENG
Continues below advertisement
1/8
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल कायम चर्चेत राहिला. (image credit- bcci)
2/8
यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. मात्र त्याने सामन्यात अनेक झेल सोडले. त्यामुळे यशस्वी जैस्वालला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोलही केले.(image credit- bcci)
3/8
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात बेन डकेटचे 3 आणि दुसऱ्या डावात बेन डकेटचा 1 झेल सोडला, जर त्याने हे झेल घेतले असते तर भारत सामना जिंकू शकला असता.(image credit- bcci)
4/8
यशस्वी जैस्वालने 97 धावांवर असताना बेन डकेटचा झेल सोडला, त्यानंतर डकेटने 149 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. जर जैस्वालने हे झेल घेतले असते तर भारत सामन्यात पुनरागमन करू शकला असता. केवळ हा झेलच नाही तर यशस्वीने पहिल्या डावात 3 झेल सोडले होते.(image credit- bcci)
5/8
पहिल्या डावात जैस्वालने ऑली पोप, बेन डकेट आणि हॅरी ब्रूकचे झेल सोडले, तिघांनीही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली.(image credit- bcci)
Continues below advertisement
6/8
आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक राहिलेल्या मोहम्मद कैफ यांनी यशस्वी जैस्वाल इतके झेल का सोडले?, यामागचं कारण सांगितलं आहे. (image credit- bcci)
7/8
मोहम्मद कैफ म्हणाला की, भारतीय गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी झाली नाही. मात्र यशस्वी जैस्वालने सामन्यात झेले पकडले असते तर भारताने हा सामना सहज जिंकला असता. हे सांगताना मोहम्मद कैफने झेल सोडण्यामागील कारणही सांगितले. (image credit- bcci)
8/8
इंग्लंडमध्ये हवामान थंड असते, चेंडू हातांना जोरात लागतो. म्हणूनच क्षेत्ररक्षक त्यांच्या हातावर टेप बांधतात. जेव्हा तुम्ही तुमच्या हातावर पट्टी बांधता तेव्हा चेंडू टेपवर उसळतो आणि हातातून निसटतो. सदर सामन्यात यशस्वी जैस्वालने देखील हातावर टेप बांधली होती, असं मोहम्मद कैफने सांगितले. (image credit- bcci)
Published at : 26 Jun 2025 01:14 PM (IST)