बर्मिंघममध्ये इतिहास लिहिणाऱ्या टीम इंडियाचे 5 हिरो, शुभमन गिल ते आकाश दीप, विजयाचं शिल्पकार कोण कोण ठरलं?
भारतानं एजबेस्टन कसोटीत इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं. भारतानं इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडचा संघ 271 धावांवर बाद झाला.
भारताच्या विजयाचे शिल्पकार
1/5
भारताच्या कसोटी टीमचा युवा कॅप्टन शुभमन गिल बर्मिंघम कसोटीत महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्यानं फलंदाजीसोबत कर्णधार पद चांगल्या प्रकारे भूषवलं. शुभमन गिलला 430 धावा केल्या बद्दल प्लेअर ऑफ मॅच पुरस्कार देण्यात आला. शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 धावा केल्या.
2/5
आकाश दीपनं दुसऱ्या डावात आणि पहिल्या डावात मिळून कसोटीत 10 विकेट घेतल्या. त्यानं पहिल्या डावात चार विकेट तर दुसऱ्या डावात 6 विकेट घेतल्या. आकाश दीपनं 99 धावा देत 6 विकेट घेतल्या. आकाश दीपनं बेन डकेट, जो रुट, हॅरी ब्रुक, ओली पोप, जेमी स्मिथ, कार्स यांच्या विकेट घेतल्या. आकाश दीपनं पहिल्यांदा पाच विकेट घेतल्याचं सांगितलं.
3/5
जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत आराम दिला गेला असताना भारताच्या गोलंदाजीचं नेतृत्व मोहम्मद सिराजवर होतं. सिराजनं पहिल्या डावात इंग्लंडच्या 6 विकेट घेतल्या होत्या. तर ,दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजनं पहिलं यश मिळवून दिलं. जॅक क्रॉलीला शुन्यावर बाद केलं.
4/5
भारताचा स्टार विकेटकीपर रिषभ पंतनं दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या डावात 25 धावांवर बाद झालेल्या रिषभनं दुसऱ्या मॅचमध्ये 65 धावांची आक्रमक खेळी केली. रिषभ पंतन दुसऱ्या डावात दमदार आणि आक्रमक भूमिका घ्यायला लावी. यामुळं भारतानं इंग्लंड समोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं.
5/5
भारताच्या टीममधील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून रवींद्र जडेजानं दमदार कामगिरी केली. जडेजानं सातव्या नंबर फलंदाजी करताना पहिल्या डावात 89 धावा केल्या. तर, दुसऱ्या डावात 69 धावा केल्या. याचा फायदा भारताला झाला.
Published at : 06 Jul 2025 11:44 PM (IST)