In Pics : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत पराभूत, इंग्लंडचा भारतावर 100 धावांनी विजयी

Continues below advertisement

ENG vs IND

Continues below advertisement
1/10
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
2/10
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने इंग्लंडचे फलंदाज बाद करण्यास सुरुवात केली.
3/10
पण अखेरच्या काही षटकांमध्ये मोईन अली आणि डेविड विली यांनी एक उत्तम भागिदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. यावेळी अलीने 47 तर विलीने 41 धावा केल्या.
4/10
भारताकडून चहलने अप्रतिम गोलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 47 धावा देत महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. पांड्या-बुमराह यांनीही प्रत्येकी दोन तर शमीने आणि प्रसिध कृष्णाने एक-एक विकेट घेतली. 
5/10
हा महत्त्वाचा सामना पाहण्यासाठी माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आला होता.
Continues below advertisement
6/10
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हा देखील यावेळी लॉर्ड्सवर आला होता.
7/10
247 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताला सुरुवातीपासून खास कामगिरी करता आली नाही. भारताते आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतत होते.
8/10
रोहित-पंत हे शून्यावर बाद झाले. शिखरही 9 तर कोहली 16 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमारने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो 27 धावा करुन बाद झाला.
9/10
image 9
10/10
त्यानंतर जाडेजाने पांड्यासोबत खेळ सावरला पण दोघेही प्रत्येकी 29 धावा करुन बाद झाले. शमीनेही 23 धावा केल्या, पण नंतरचे गडी पटापट बाद झाले, 38.5 ओव्हलमध्ये भारत सर्वबाद झाला आणि सामना इंग्लंडने 100 धावांनी जिंकला.
Sponsored Links by Taboola