In Pics : भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय, कसा पार पडला सामना?
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 विकेट्सनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय खेळाडूंनी आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी दाखवली.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळी त्याने तब्बल 6 गडी तंबूत धाडले. तर त्यानंतर रोहितने 76 धावांनी नाबाद खेळी करत सामना भारताच्या नावे केला.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने सुरुवातीपासून इंग्लंडचे फलंदाज बाद करण्यात सुरुवात केली.
सामन्यात सर्वाक आधी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने सुरुवातीपासून इंग्लंडचे फलंदाज बाद करण्यात सुरुवात केली.यावेळी बुमराहने अप्रतिम अशी 7.2 ओव्हरमध्ये 19 रन देत 6 विकेट्स घेतल्या. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक विकेट घेतली.
इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या.
111 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलााग करताना रोहितने एका बाजूने फटकेबाजी करत शिखरने संयमी फलंदाजी केली.
रोहितने 58 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर शिखरने 54 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि केवळ 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता विजय मिळवला.
सामन्यातील अप्रतिम गोलंदाजीसाठी बुमराहला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात आलं.
हा विजय मिळवत मालिकेत भारताने 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे.