In Pics : ऑस्ट्रेलियाला टी20 मालिकेत मात देण्यासाठी भारत सज्ज, कसून सराव सुरु, बीसीसीआयनं शेअर केले फोटो
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेला आता एक दिवस शिल्लक असून टीम इंडिया कसून सराव करताना दिसत आहे.
IND vs AUS
1/12
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आागामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी टी20 मालिका खेळवली जात आहे.
2/12
या मालिकेसाठी दोन्ही संघ मोहालीला पोहोचले असून सध्या कसून सराव करताना दिसत आहेत.
3/12
बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाचे (Team India) सराव करतानाचे फोटो नुकतेच त्यांच्या ट्वीटर हँडलवर शेअर केले आहेत.
4/12
या फोटोंमध्ये भारताचे खेळाडू नेटमध्ये बॅटिंग सराव करत असून बोलिंगचा सरावही करत आहेत. तसंच बॅडमिंटनसारखे इतरही खेळ खेळताना दिसताना आहेत.
5/12
यावेळी फोटोंमध्ये भारताचे मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल हे देखील दिसून आले आहेत.
6/12
दोघेही दुखापतीमुळे मागील काही सामने टीम इंडियामध्ये नसल्याचं दिसून आलं. आशिया कपमध्येही दोघे नसल्याने भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत झाली होती. पण दोघेही दुखापतीतून सावरले असून आता विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी सराव करताना दिसत आहेत.
7/12
भारताचे सर्वच खेळाडू सराव करत असन रवीचंद्रन आश्विन हा अनुभवी गोलंदाजही विश्वचषक स्पर्धेसाठी संघात असल्याने त्याच्याकडे सर्वांच्याच अपेक्षा असणार आहेत.
8/12
आश्विनच्या जोडीला युजवेंद्र चहल हा देखील संघात असून त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा सर्वांनाच आहे.
9/12
दीपक चाहर याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळालेलं नाही. पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी तो संघात असल्याने त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल जेणेकरुन भविष्यातील स्पर्धांसाठी तो संघात स्थान मिळवू शकतो.
10/12
भारतीय फलंदाजांवर ऑस्ट्रेलियातील बाऊन्सींग खेळपट्टीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार असून यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका एक चांगला सराव असणार आहे.
11/12
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दीक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण त्याचा हा फॉर्म वर्ल्डकपसाठीही कायम राहावा अशी आशा सर्वच भारतीय चाहते करत असून तो ही कसून सराव करताना दिसत आहे.
12/12
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने 20, 23 आणि 25 सप्टेंबररोजी खेळवले जाणार आहेत.
Published at : 19 Sep 2022 05:00 PM (IST)