In Pics : इंदूर कसोटीत भारताचा 9 विकेट्सने मोठा पराभव, मालिका 2-1 अशा स्थितीत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. उत्कृष्ट गोलंदाजी तसच संयमी फलंदाजीच्या जोरावर कांगारुंनी हा सामना सहज जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनी भारताला मात या सामन्यात मात दिली आहे. भारताची खराब फलंदाजी भारतासाठी तोट्याची ठरली.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील या विजयासह मालिकेतील ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम असून सद्यस्थिती भारत 2 विजय तर ऑस्ट्रेलिया 1 विजय अशी आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या दोन्ही डावातही गोलंदाजांचंच वर्चस्व दिसून आलं.
पहिल्या डावात भारत केवळ 109 धावांत सर्वबाद झाला. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारताने 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं.
ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावाचं माफक लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने केवळ 1 विकेट गमावत ट्रेव्हिस हेडच्या नाबाद 49 आणि लाबुशेनच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर सामना जिंकला.
WTC गुणतालिकेत आधीपासून अव्वल स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने या विजयासह आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.
ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC) च्या फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे.