ICC T20 Rankings: हार्दिक पांड्याला आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फटका, यशस्वी जयस्वालला लॉटरी, सूर्या कितव्या स्थानी?
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दमदार कामगिरीचा यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलला फायदा झाला आहे. यशस्वी जयस्वाल दहाव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुभमन गिलनं देखील दमदार कामगिरी केली होती. गिलच्या टी 20 रँकिंगमध्ये 36 स्थानांचा फायदा होऊन तो 37 व्या स्थानावर पोहोचला आहे.
ऋतुराज गायकवाडला मात्र यावेळी टी 20 रँकिंगमध्ये नुकसान झालं आहे. तो एका क्रमांकानं घसरुन 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादव झिम्बॉब्वे विरूद्धच्या मालिकेत खेळला नव्हता. तरी देखील तो दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ट्रेविस हेड आहे.
रिंकू सिंगला पाच टी 20 सामन्यांमध्ये चांगली संधी मिळाली नव्हती.रिंकू सिंग आठ स्थानांनी घसरुन 49 व्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसीनं टी 20 मधील ऑलराऊंडर्स रँकिंग देखील जाहीर केलं आहे. टी20 वर्ल्ड कप संपला तेव्हा हार्दिक पांड्या पहिल्या स्थानावर पोहोचला होता. झिम्बॉब्वे विरुद्धच्या मालिकेत न खेळल्यानं तो सहाव्या स्थानावर पोहोचला.