Hardik Pandya Girlfriend Mahieka Sharma : गर्लफ्रेंडच्या गळ्यात हात ठेवून हार्दिक पांड्याची रोमॅन्टिक एन्ट्री! पण माहिका झाली उदास, नेमकं का घडलं?

IND vs SA 5th T20I : लखनऊहून हार्दिक आणि माहिका एकत्र अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. मात्र विमानतळाबाहेर दोघांना वेगवेगळं व्हावं लागलं.

Continues below advertisement

Hardik Pandya Girlfriend Mahieka Sharma

Continues below advertisement
1/8
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
2/8
या सामन्यासाठी दोन्ही संघ गुरुवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले.
3/8
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या यावेळी आपल्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत प्रवास करताना दिसला.
4/8
लखनऊहून हार्दिक आणि माहिका एकत्र अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. मात्र विमानतळाबाहेर दोघांना वेगवेगळं व्हावं लागलं.
5/8
टीम इंडियाच्या बसमध्ये बसण्यापूर्वी हार्दिकने माहिकाला कारमध्ये बसवून हॉटेलकडे रवाना केलं.
Continues below advertisement
6/8
या क्षणी माहिकाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून चाहते अंदाज बांधत आहेत की हार्दिकपासून वेगळं व्हावं लागल्याने ती थोडीशी उदास झाली होती.
7/8
विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक माहिकाच्या खांद्यावर हात ठेवून बाहेर येताना दिसत आहे. मात्र बाहेर आल्यानंतर दोघांना वेगळं व्हावं लागलं.
8/8
लखनऊमध्येही हार्दिक माहिकासोबत दिसली होती. गुरुवारी ती संघासोबत अहमदाबादमध्ये आली असली, तरी सामन्यापूर्वी हार्दिकला टीम बसमध्ये बसावं लागलं. त्यामुळे माहिका एकटीच कारमधून हॉटेलकडे निघाली. त्या वेळी तिच्या चेहऱ्यावरची निराशा चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही.
Sponsored Links by Taboola