Rohit Sharma : शुभमन गिल की यशस्वी जयस्वाल? चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? दिनेश कार्तिकनं कुणाचं नाव घेतलं?

पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. भारताकडे यावेळी 2013 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. कॅप्टन रोहित शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार असा प्रश्न सर्वांसमोर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचं समीकरण चांगलं आहे. यशस्वी जयस्वालनं बॅकअप सलामीवीर म्हणून कामगिरी पार पाडावी. शुभमन गिल अपयशी ठरल्यास त्याला संधी मिळेल, असं कार्तिक म्हणाला.

शुभमन गिल नुकत्याच झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेत चांगली कामगिरी करु शकला नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही वनडे सामन्यांची असल्यानं त्याचा विचार केला असता शुभमन गिलनं श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांमध्ये 19 च्या सरासरीनं 57 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे यशस्वी जयस्वालनं नुकत्याच पार पडलेल्या झिम्बॉब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात टी 20 मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळं यशस्वी जयस्वालला संधी मिळते का ते पाहावं लागेल.