Dhanashree Verma : युजवेंद्र चहलशी घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ, नेटकरी म्हणाले; नवा बकरा शोधतीये

Dhanashree Verma : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याचा पत्नी धनश्री वर्मासोबत काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दोघांच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं चित्र आहे.
युजवेंद्र चहल याने घटस्फोटाची चर्चा सुरु असताना सॉक्रेटीसचे विचार पोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती.
तर दुसरीकडे धनश्री वर्मा इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे.
दोन दिवसांपूर्वी धनश्रीने इन्स्टाग्रामवर 'छोड छोड मेरी राहो को' या गाण्यावर तुफान डान्स केला होता.
आता धनश्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
धनश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, युजवेंद्रशी घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री सातत्याने नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असल्याचं चित्र आहे.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी 'ही नव्या बकऱ्याच्या शोधात आहे', अशा कमेंट्स केल्या आहेत.