PHOTO : भीषण कार अपघातात क्रिकेटपटू ऋषभ पंत जखमी
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (PHOTO : MANOGYA LOIWAL Twitter)
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत.
सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाण्याची शक्यता आहे.
ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून जात होता. (PHOTO : Rahul Parashar Twitter)
ऋषभ पंतचे घर रुरकी इथे आहे. त्याची कार नरसन शहराजवळ आल्यावर गाडीचे नियंत्रण सुटले आणि रेलिंग आणि खांब तोडून कार उलटली. (PHOTO : Rahul Parashar Twitter)
क्रिकेटपटू ऋषभ पंतला तातडीने सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथून त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. (PHOTO : Rahul Parashar Twitter)