England Ashes Series 2025 : क्रिकेट विश्वात खळबळ! मालिका पराभवानंतर दारूचा वाद पेटला, इंग्लंड खेळाडूंवर मद्यपानाचे गंभीर आरोप
England Ashes Series 2025 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत आणखी एक पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ नव्या अडचणीत सापडताना दिसत आहे.
Continues below advertisement
England Ashes Series 2025
Continues below advertisement
1/7
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत आणखी एक पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ नव्या अडचणीत सापडताना दिसत आहे.
2/7
तिसऱ्या कसोटीत 82 धावांनी झालेल्या पराभवामुळे केवळ मालिका हातातून गेली नाही, तर आता संघाच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
3/7
या पार्श्वभूमीवर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ला संघातील शिस्त आणि वागणुकीची चौकशी करावी लागणार आहे.
4/7
कर्णधार बेन स्टोक्ससह काही खेळाडूंनी मालिकेदरम्यान घेतलेल्या ब्रेकमध्ये अति प्रमाणात मद्यपान केल्याचा आरोप आहे.
5/7
तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघाने चार दिवसांचा ब्रेक घेत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध हॉलिडे रिसॉर्ट नोसा येथे मुक्काम केला होता.
Continues below advertisement
6/7
आता माध्यमांतील अहवालांनुसार, या काळात काही खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर दारूचे सेवन केले. त्यामुळे शिस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
7/7
या आरोपांनंतर इंग्लंडचे मॅनेजिंग डायरेक्टर रॉब की यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. मात्र, सुरुवातीच्या माहितीनुसार खेळाडूंचे वर्तन योग्यच होते, असेही त्यांनी सांगितले.
Published at : 23 Dec 2025 02:26 PM (IST)