Ben Stokes : एकदिवसीय क्रिकेटमधून बेन स्टोक्सने घेतली निवृत्ती, सोशल मीडियावरुन दिली माहिती
बेन स्टोक्स
1/10
इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार असणाऱ्या बेन स्टोक्सने अचानकपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
2/10
काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, ज्यानंतर आता बेननेही निवृत्ती जाहीर केली आहे.
3/10
स्टोक्सने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिली आहे.त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन एक भावूक पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.
4/10
बेनने ही माहिती देताना विश्वचषकासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
5/10
स्टोक्स त्याचा अखेरचा सामना उद्या अर्थात 19 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहम येथे खेळणार असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील हा पहिला एकदिवसीय सामना आहे.
6/10
बेनने एक अत्यंत भावूक पोस्ट लिहित निवृत्ती जाहीर केली असून यावेळी त्याने इंग्लंडचा एकदिवसीय संघाचा सध्याचा कर्णधार जोस बटलरसह संपूर्ण इंग्लंड क्रिकेटचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10
स्टोक्स हा इंग्लंड क्रिकेटमधील एक सर्वात महान अष्टपैलू क्रिकेटर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
8/10
संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या स्टोक्सने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
9/10
दरम्यान बेन एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी कसोटी आणि टी20 सामने तो खेळणारच आहे.
10/10
यंदा होणाऱ्या टी20 विश्वचषकातही बेन इंग्लंड संघात असण्याची दाट शक्यता आहे.
Published at : 18 Jul 2022 09:30 PM (IST)