In Pics : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु, बीसीसीआयनं पोस्ट केले खास फोटो
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. चार सामन्यांची अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिका दोन्ही संघात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सराव करत मैदानात घाम गाळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे संघाच्या कॅम्पमध्ये एकूण 10 फिरकीपटू आहेत. जे खेळाडूंची प्रॅक्टिस घेत आहेत. त्यामुळे फिरकीपटूंना घेऊन रोहितचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास रणनीती आखत असल्याचं दिसून येत आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठीच भारताने संघ घोषित केला आहे. यामध्ये कुलदीप यादवचा संघात फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांना अष्टपैलू फिरकीपटू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. अशा प्रकारे टीम इंडियामध्ये एकूण चार फिरकीपटू आहेत.
पण भारतीय कॅम्पमध्ये सध्या 10 फिरकीपटू आहेत. जे सर्व फलंदाजांना नेटमध्ये सराव करून घेत आहेत आणि स्वत:चाही सराव करुन घेत आहेत. टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये जाडेजा, अश्विन, अक्षर आणि कुलदीप तसेच वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, जयंत यादव, पुलकित नारंग, साई किशोर आणि राहुल चहर यांचा समावेश आहे. हे सर्व गोलंदाज कसून सराव करत आहेत. भारतीय संघाने यापूर्वीच साई किशोर, राहुल, सौरभ आणि सुंदर यांची नेट गोलंदाज म्हणून निवड केली होती. यानंतर जयंत आणि नारंग यांचाही आता समावेश करण्यात आला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येत आहे. ही मालिका पहिल्यांदा 1996-97 मध्ये खेळली गेली होती. भारताने तेव्हा मालिका 1-0 ने जिंकली होती. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदाही विजय मिळवला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2020-21 मध्ये शेवटची मालिका खेळली गेली होती. ही देखील टीम इंडियाने 2-1 ने जिंकली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातृभूमीत जाऊन मात दिली होती
भारताने या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. श्रीलंका त्यानंतर न्यूझीलंड दोघांनाही टी20 आणि एकदिवसीय मालिकेत भारतानं मात दिली.
ज्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत मात दिल्यावर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अधिक फायदा होऊ शकतो.