In pics : अर्जून तेंडुलकर चंदीगडमध्ये, युवराजच्या वडिलांजवळ घेतोय कोचिंग
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर सध्या चंदीगडध्ये सरावात व्यस्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्जून माजी क्रिकेटर युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह यांच्याकडे कोचिंग घेत आहे.
योगराज सिंह हे स्वत:ही एक माजी क्रिकेटर असून त्यांनी बालपणीपासून युवराज सिंहला क्रिकेटचे धडे गिरवायला लावल्याने युवराज जगातील एक दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर बनू शकला.
युवराजने भारताला 2007 चा टी20 आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. आता अर्जूनही योगराज यांच्याकडे क्रिकेटती कोचिंग घेताना दिसत आहे.
अर्जून सोबतचे काही फोटो योगराज सिंह यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत.
अर्जून तेंडुलकर मागील दोन वर्षांपासून तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे, परंतु अद्याप त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.
2021 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जूननं मुंबईसाठी दोन सामने खेळले होते.
आयपीएल 2021 मध्ये सर्वात आधी मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसला अर्जूलना संघात घेतलं होतं. पण संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही.
त्यानंतर यंदा आयपीएल 2022 च्या महालिलावात त्याच्या 20 लाख बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने 25 लाखांची बोली लावली. ज्यानंतर मुंबईने 30 लाखांची बोली लावत त्याला विकत घेतलं. त्यामुळे अर्जूनला नेमकी कधी संधी मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे.
आता योगराज यांच्या कोचिंगचा अर्जूनला कितपत फायदा होणार हे ही भविष्यात कळेल.