ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी कॅप्टन अमरिंदर सिंह बनले 'मास्टर शेफ', स्वत: बनवले जेवण
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी आज जेवण बनवले आहे. (Image: Twitter/ @ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज रात्री मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केले आहे. (Image: Twitter/ @AnumaVidisha)
राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांनी स्वत: खेळाडूंसाठी जेवण बनवले आहे.(Image: Twitter/ @ANI)
स्नेहभोजनासाठी पारंपारिक पदार्थांबरोबरच पुलाव, चिकन, बटाट्याची भाजी आणि जर्दा पुलाव( गोड पुलाव) बनवला आहे.
पंजाबमधील ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी तसेच देशासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या हरियाणा नीरज चोप्राला दिलेल्या वचनानुसार खेळाडूंसाठी स्वत: जेवण बनवले आहे.
खूप कमी लोकांना माहित आहे की, मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे उत्तम जेवण बनवतात. स्वयंपाक बनवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.
अमरिंदर सिंह यांनी गावराना तुपात बनवलेल्या मटन ज्यांनी खाल्ले आहे, ते त्यांचे फॅन झाले आहे. अमरिंदर सिंह यांना जेवण बनवण्याबरोबरच आपल्या मित्रांना बनवून वाढायला देखील आवडते.