Taekwondo Championship 2023 : कराडच्या प्रिशाची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं कांस्यपदक
आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत साताऱ्याच्या कराड येथील प्रिशा शेट्टीने कांस्यपदक पटकावलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रिशा शेट्टीने पदार्पणातच भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. शुक्रवारी लेबनॉन येथे आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला.
प्रिशा शेट्टीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण करण्यासह पदर पटकावण्याची लक्षवेधी आणि विक्रमी कामगिरी केली आहे.
कॅडेट गटामध्ये पदक मिळवणारी प्रिशा शेट्टी ही महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
सातारा जिल्ह्यातील खेळाडू कुमारी प्रिशा शेट्टी हिने आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत कॅडेट गट भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्यपदक पटकावलं आहे.
प्रिशा शेट्टी मागील आठ वर्षापासून एपी स्पोर्ट्स आगाशीवनगर, कराडमध्ये प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये प्रशिक्षक अमोल पालेकर आणि प्रशिक्षक अक्षय खेतमर यांनी तिला मार्गदर्शन केलं आहे.
सातारा जिल्हा अॅमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन माध्यमातून प्रिशा अगदी कमी वयापासून खेळत आहे.
ग्रामीण भागातील प्रिशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे. प्रिशाच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.