Andrew Symonds : जबरदस्त ऑलराऊंडर काळाच्या पडद्याआड; अँड्र्यू सायमंड्सच्या अपघाती मृत्यूनंतर क्रीडाक्षेत्र हळहळलं
ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे.
सायमंड्सच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
क्रिकेट विश्वात त्याच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेन वॉर्नच्या मृत्यूच्या काही आठवड्यानंतर क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
सायमंड्सची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट शेन वॉर्नला श्रद्धांजली देणारी होती.
सायमंड्सचं करिअर शानदार होतं. त्याने 198 वनडे सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या.यामध्ये सहा शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.
सायमंड्स ऑल राऊंडर क्रिकेटपटू होता. त्याने वनडे फॉर्मेटमध्ये 133 विकेट घेतल्या.
26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतल्या आहेत. सायमंड्स 14 टी 20 सामने खेळले.