Ambati Rayudu : चेन्नईचा धाकड फलंदाज अंबाती रायडू... कधी काळी व्हायची सचिनशी तुलना
Feature_Photo_6
1/9
भारताचा माजी खेळाडू आणि चेन्नईचा धाकड फलंदाज अंबाती रायडूचा परवा वाढदिवस झाला. भारताकडून जेमतेम 55 वनडे सामने खेळायला मिळालेल्या रायडूने त्या सामन्यांतही तब्बल 47.05च्या सरासरीने 1694 धावा केल्या. (Photo:@a.t.rayudu/IG)
2/9
रायडूने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जात होती. (Photo:@a.t.rayudu/IG)
3/9
अंबाती रायडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2001-02मध्ये हैद्राबाद संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती. पण 2005 मध्ये हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनशी वाद झाल्याने तो त्यावर्षी आंध्रप्रदेशकडून क्रिकेट खेळला. (Photo:@a.t.rayudu/IG)
4/9
(Photo:@a.t.rayudu/IG)
5/9
पण त्याला आंध्रप्रदेशकडून अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो परत हैद्राबाद संघात परतला.(Photo:@a.t.rayudu/IG)
6/9
अंबाती रायडू 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला आहे. 2004 ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात तो भारतीय संघाचा कर्णधार होता. (Photo:@a.t.rayudu/IG)
7/9
2007 मध्ये रायडूने इंडियन क्रिकेट लीग(आयसीएल) खेळण्यासाठी करार केला होता. त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने बंदी घातली होती. त्यानंतर 2009 ला बीसीसीआयने रायडूला आयसीएलचा करार संपल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली.(Photo:@a.t.rayudu/IG)
8/9
(Photo:@a.t.rayudu/IG)
9/9
इंग्लंड आणि वेल्स येथे जून-जूलैमध्ये पार पडलेल्या 2019 वनडे विश्वचषकात रायडूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. त्यानंतर रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतला होता. पण त्यानंतर त्याने निवृत्तीच्या निर्णयावर पुन्हा विचार करत ऑगस्टच्या अखेरीस निवृत्ती मागे घेतली.(Photo:@a.t.rayudu/IG)
Published at : 25 Sep 2021 10:06 AM (IST)