उन्हाचा झळा तीव्र; वाघांचा पाणवठ्यावर ठंडा ठंडा कुल कुल अनुभव! पाहा फोटो
तापमानाचा पारा वाढल्याने माणसांना मोठा त्रास होत असताना मुक्या प्राण्यांनाही त्याचा किती त्रास होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतीव्र झालेल्या उन्हाच्या झळांपासून आराम मिळवण्यासाठी वाघोबांनी थेट पाणवठ्याचा आसरा घेतला आहे,
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पाण्याच्या डबक्यामध्ये वाघाने बैठक मारली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
त्यामुळे माणसांनाच नव्हे तर जंगलातील प्राण्यांनाही याचा त्रास होत आहे.
या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी टिपेश्वर अभयारण्यातील वाघ सुद्धा पाण्यात डुबकी लावत आहे.
नेमका हा क्षण टिपण्यासाठी रखरखत्या उन्हात आंध्र प्रदेश, मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून पर्यटक आले आहेत.
तसेच यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील पर्यटक टिपेश्वर अभयारण्यात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्यावर 'थंडा थंडा कुल कुल'चा अनुभव घेताना या वाघांना यवतमाळच्या डॉक्टर निखिल भागवते यांनी कॅमेरात कैद केले.