Maharashtra Chitrarath : राजधानीत महाराष्ट्राच्या चित्ररथात झळकणार यवतमाळमध्ये तयार केलेली शिल्पे
प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठ आणि नारी शक्ती या विषयावरील चलचित्र देखावा साकारला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे या चलचित्र देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आली आहेत.
पाटणबोरी येथील यशवंत एकनाथ येणगुटीवार यांनी ही शिल्पे तयार केली आहेत.
यंदा महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहुर आणि वणी इथल्या देवींच्या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे राजपथावरील पथसंचलनात होणार आहे.
त्यासाठी साडेतीन शक्तिपीठांच्या देवी आणि अन्य शिल्प साकारण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे या चलचित्र देखव्यात साकारण्यात आलेली सर्व शिल्प यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या पाटणबोरी इथल्या यशवंत येणगुटीवार या शिल्पकाराने साकारली आहेत.
साडेतीन शक्तिपीठच्या चित्ररथामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नाशिकची सप्तशृंगी माता आणि माहूरची रेणुका माता यांचे शिल्प साकारण्यात आले आहेत.
शिवाय देवीसमोर गोंधळ करणारे गोंधळी ज्यामध्ये पोतराज, हलगीवाला, जोगवा मागणारे आणि इतर दहा शिल्प चित्ररथामध्ये दिसणार आहेत.
बहुतांश शिल्पांची उंची सहा फूट ते नऊ फुटांपर्यंत राहणार आहे. विशिष्ट फायबरपासून ही शिल्प तयार करण्यात आली आहेत.
अल्पकालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली आहेत.