एक नंबर ! दोन भावंडांनी तयार केली बॅटरीवर चालणारी ई-बायसिकल
सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे प्रदूषण टाळता यावं आणि मोठ्या प्रमाणात इंधनची बचत व्हावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन भावांनी ई बायसिकल तयार केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळ शहरातील नेताजी नगर इथे वास्तव्यात असलेल्या दोन भावंडांनी बॅटरीवर असलेली ई-बायसिकल तयार केली आहे.
यामध्ये एका तासामध्ये पन्नास किलोमीटरचा प्रवास करता येईल. कौशिक शेलोटकर आणि त्याचा लहान भाऊ श्री शेलोटकर या दोन बंधूंनी दहा दिवसात ही सायकल तयार केली आहे.
कौशिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करत आहे. तसेच हॉलीबॉल खेळाडूपट्टू म्हणून त्याचे नाव आहे. तर श्री हा लॉ चे शिक्षण घेत आहे. तर त्याचे वडील राजेंद्र सिलोटकर हे मूर्तिकार असून आई सुवर्णा ही गृहिणी आहे.
कौशिक ने सायकलचे डिझाईन तयार केले तर श्री नेही यावर काम सुरू केले होते. दहा दिवसाच्या परिश्रमातून ईसायकल तयार केली.
नवा पर्याय यवतमाळकरण पुढे ठेवलाय ब्रँडेड कंपनीच्या ई बाईक पेक्षाही दमदार अशी ही सायकल त्यांनी तयार केली आहे.
घरात भंगारात पडलेली सायकल दुरुस्त करून तिचाही ई सायकल म्हणून वापर करता येतो.
हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच त्यावर बॅटरी लावून ही सायकल तयार करण्यात आली. अतिशय कमी पैशात ई सायकल तयार होते.
बॅटरी व मोटर ची वॉरंटी असल्याने किमान दोन वर्ष तरी कुठलाही खर्च येत नाही. सायकललाच मोटार बसून बॅटरीवर चालविता येते.
त्यात त्याने दोन मोड दिले आहेत डिक्स ब्रेक मुळे वेगावर नियंत्रण ठेवता येते.
जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये या सायकलला तयार करण्यासाठी खर्च येतो असे कौशिक आणि श्री यांनी सांगितले.