Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
Yavatmal ST Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला मारेगांव तालुक्यातील जळका फाट्याजवळ ट्रकनं धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement
चंद्रपूर यवतमाळ बसचा अपघात, दोघांचा मृत्यू
Continues below advertisement
1/5
महाराष्ट्रातील रस्ते अपघातांची मालिका सुरुच आहे. चंद्रपूरहून यवतमाळला जाणाऱ्या एसटी बसला ट्रकनं धडक दिली. या घटनेत दोन प्रवाशांचा मृ्त्यू झाला.
2/5
एसटी बसला ट्र्कनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले तर 14 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
3/5
यवतमाळच्या मारेगांव तालुक्यातील जळका फाट्याजवळ चंद्रपूर-यवतमाळला बसला अपघात झाला.
4/5
चंद्रपूर-वणी वरून यवतमाळकडे येणाऱ्या बसला करंजीकडून वणीकडे जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. ट्रक एसटी बसची ड्रायव्हर साईट पूर्ण चिरत गेल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 14 प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातातील मृतांची नावं अद्याप कळू शकली नाहीत.
5/5
एसटी अपघातातील जखमींना यवतमाळ,पांढरकवडा येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं. घात एवढा भयंकर होता की,एसटी बसची ड्रायव्हर साईट अक्षरश: पूर्ण चिरल्यानं दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
Continues below advertisement
Published at : 04 Dec 2025 10:25 PM (IST)