PHOTO : World Sight Day चा इतिहास आणि महत्व काय?
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामान्य जनतेमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच अंध व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीदानाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, वेगवेगळे नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो.
मनुष्याच्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे डोळा. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीच नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात केवळ अंधार आणि अंधारचं असतो.
सुरुवातीला एका खासगी संघटनेच्या वतीनं SightFirstCampaign या माध्यमातून 8 ऑक्टोबर 1998 रोजी पहिल्यांदा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात आला.
नंतर जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाईन्डनेस (IAPB) यांच्या वतीनं ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं.
image 7
जगभरातील लोकांमध्ये दृष्टीबद्दल जागरुकता निर्माण करणे तसेच ज्यांना अंधत्व आहे अशांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करणे असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.