Kim Jong Un : हुकुमशाह किम जोंग उनची खास बुलेट प्रूफ ट्रेन; सेवेसाठी महिला नोकर, उत्कृष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी
Kim Jong Un Special Train : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे प्रकाशझोतात असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया महिन्यात किम जोंग उन रशिया दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी किम जोंग उन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार आहेत.
किम जोंग उन रशिया दौऱ्यासाठी त्याच्या खास ट्रेनने प्रवास करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन रशियाला जाण्यासाठी त्याच्या खासगी ट्रेनचा वापर करणार आहे. ही ट्रेन त्याला त्याच्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळाली आहे.
किम जोंग उनच्या खासगी ट्रेनमध्ये एखादे पंचतारांकित हॉटेल आणि राजवाड्याप्रमाणे सोयीसुविधा आहेत.
या ट्रेनचा सरासरी वेग ताशी 37 मैल आहे. किम जोंगची खासगी ट्रेन बुलेट प्रुफ आहे. किम जोंग उनच्या या ट्रेनची सुरक्षा अतिशय मजबूत असल्याचं मानलं जातं.
दक्षिण कोरियाच्या मीडिया रिपोर्टनुसार, या ट्रेनला 100 सुरक्षा रक्षकांची नजर असते. हे रक्षक बॉम्ब आणि इतर संभाव्य धोक्यांसाठी मार्ग आणि आगामी स्टेशन स्कॅन करतात आणि त्यानंतर ट्रेन पुढे जाते.
किम जोंग उनच्या ट्रेनमध्ये प्रेस कॉन्फरन्स हॉल, अनेक बेडरूम, सॅटेलाइट फोन, फ्लॅट स्क्रीन टीव्ही देखील आहेत. ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये प्रशस्त बाथरूम आणि जेवणाची व्यवस्था आहे. ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये सेवेसाठी महिला कर्मचारीही असतात.
किम जोंग उन जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा त्याच्या ट्रेनसोबत इतर तीन ट्रेनही धावतात. त्यांची एक ट्रेन रेल्वेमार्ग तपासते, दुसऱ्या ट्रेनमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात असतात आणि इतर अधिकाऱ्यांसाठी तिसरी ट्रेन असतात.
2002 मध्ये एक रशियन अधिकारी किम जोंग यांच्यासोबत मॉस्कोला गेले होते. त्या अधिकाऱ्यांनी किम जोंगच्या खास ट्रेनमधील सुविधांबाबत सांगितलं.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत शस्त्रास्त्रांवर चर्चा करण्यासाठी रशिया दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा आहे.