तुम्हाला पृथ्वीचं वय माहितीय? वेद, पुराणांनुसार, अजूनही तरुण की, आता अंत जवळ आलाय?
पण तुम्ही कधी विचार केलाय का? ज्या पृथ्वीवर आपण राहतो, आपलं संपूर्ण आयुष्य जगतो, त्याच पृथ्वीचं वय किती असेल?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या पृथ्वीवर असंख्य सजीव राहतात, त्या पृथ्वीचं वय जाणून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल... पृथ्वी किती जुनी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचं वय ठरलेलं आहे. मानवाला स्वतःची, त्यांच्या कुटुंबाची आणि अगदी त्यांच्या पूर्वजांची जन्मतारीख आठवते. पण तुम्हाला पृथ्वीची जन्मतारीख माहीत आहे का? जाणून घेऊयात सविस्तर...
पृथ्वीच्या वयाबद्दल, ग्रीक तज्ज्ञ ॲरिस्टॉटल यांनी एक अंदाज लावला आहे. त्यांनी सांगितलंय की, काळाला अंत किंवा सुरुवात नाही. अशा स्थितीत पृथ्वीचं वय अनंत असल्याचं म्हटलं आहे.
भारतातील विद्वानांनी त्यांच्या ज्ञानाच्या आधारे, बिग बँगसारख्या घटनांच्या आधारे पृथ्वीचे वय 190 कोटी वर्ष असल्याचा अंदाज लावला आहे.
सर्वात अचूक अंदाज 20 व्या शतकाच्या सुरूवातीस केला गेला. जेव्हा क्लेअर पॅटरसननं आकाशातून पडलेल्या उल्कापिंडांची तपासणी करण्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंगचा वापर केला. तेव्हा पृथ्वीचं वय 450 दशलक्ष वर्ष असल्याचा अंदाज लावला गेला.
शास्त्रज्ञ दीर्घ काळापासून पृथ्वीचं वय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पृथ्वीचं वय 450 कोटी वर्ष आहे, असा एक सिद्धांत आहे. ज्यामध्ये 5 कोटी वर्षे पुढे आणि मागेही असू शकतात.
हिंदू वेदांमध्ये असं म्हटलं आहे की, पृथ्वी अंदाजे 155.52 ट्रिलियन मानवी वर्ष जुनी आहे. त्याचे एकूण आयुर्मान 311.04 ट्रिलियन मानवी वर्ष आहे.